

जागतिक पर्यावरण दिवस, बारावीचे विद्यार्थी आणि आव्हान भविष्याचे!
मला या मुलीचे नाव माहिती नाही, तसेच तिच्याविषयी कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत, तरीही तिच्या या निरागस शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की त्यामुळे कुणाचेही मन हेलावून जाईल (म्हणजे शहाण्या माणसाचे असे मला म्हणायचे आहे). म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या (पुन्हा एकदा) निमित्ताने लिहीलेल्या या लेखासाठी मी तिचेच अवतरण वापरले आहे. मला जेव्हा सिम्बायोसिस कॉलेजमधून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला १२वीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉल आला व तो योगायोगाने जागतिक पर्यावरण दिन होता, तेव्हा मला दोन गोष्टींचा आनंद झाला.
माझा वाघ दिवस; बांधवगड डायरी !!
"नशीब तुम्हाला साथ देईल असे कधीही गृहित धरू नका, मात्र एखादा दिवस असा असतो की तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने आहे याची जाणीव होते, अशावेळा मात्र नशिबाला जास्तीत जास्त फायदा करून घ्या"
वरील शब्द माझेच आहेत व बांधवगढ राष्ट्रीय अभयारण्यातील दिवसभराच्या सफारीनंतर मी काढलेल्या छायाचित्रांवरून नजर टाकत असताना (तेथे अनेक छायाचित्रे काढली) व आम्हाला किती वाघ दिसले हे मोजत असताना माझ्या मनात हा विचार आला. मी जंगलात अनेक वाघ पाहिले आहेत (अर्थात ते कधीही पुरेसे नसते) व मला माहितीय निस्सीम वन्यजीवप्रेमी (म्हणजे वन्यजीवन छायाचित्रकार नाही तर अशा व्यक्ती ज्यांना वन्यजीवन समजले आहे
जंगल बेल्स, वन्य जीवन आणि जागतिक बँक!
बिंदी सू आयर्विन ही एक ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणीवरील सादरकर्ती, वन्यजीवन संवर्धक, प्राणी संग्रहालयाची व्यवस्थापक व नायिका आहे. ती दिवंगत पर्यावरणवादी व दूरचित्रवाणीवरील सादरकर्ते स्टीव्ह आयर्विन व त्यांची वन्यजीवन संवर्धक पत्नी टेरी आयर्विन यांची थोरली मुलगी आहे, ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एका प्राणिसंग्रहालयाची मालक आहे. अशी पार्श्वभूमी असल्यावर ती समृद्ध वन्यजीवन असलेल्या भविष्याची स्वप्न पाहाते यात काहीच आश्चर्य नाही. मात्र जोपर्यंत आपण सगळे जण तिच्या कामात योग्य प्रकारे हातभार लावत नाही, तोपर्यंत तिचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहील यात शंका नाही. बिंदीसारखे अनेक लोक आहेत व म्हणूनच माझ्यासारख्या वन्यजीवप्रेमींच्या मनामध्ये अजूनही वन्यजीवनाच्या भविष्यासाठी आशा जिवंत आहे.
जीवनाचा दृष्टीकोन - संजय देशपांडे Vision of Life - Sanjay Deshpande